एकदा सर्व अवयव पोटावर रुसून बसले.
पाय म्हणाले, मला इतकं चालावं फिरावं लागतं तेव्हा कुठे अन्न मिळतं.
हात म्हणाले, आम्हाला काम करावं लागतं, अन्नाचे तुकडे करून तोंडात घालावे लागतात तेव्हा कुठे अन्न मिळतं.
तोंड म्हणालं, मला अन्न चावावं लागतं आणि सगळं जातं पोटात.
पोट मात्र काही करत नाही तरीही सगळं अन्न मिळतं पोटाला.
त्यांनी पोटाविरुद्ध संप पुकारला.
पोटाला अन्न मिळु द्यायचं नाही असा त्यांनी निर्धार केला.
पण ते हे विसरले कि पोटातुनच अन्न पचून त्यांना ऊर्जा मिळत होती.
पोटाला अन्न बंद झालं तशी त्यांना मिळणारी ऊर्जा बंद झाली आणि ते कमजोर पडायला लागले.
आता पोटाचं महत्व त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी संप मागे घेतला.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take