You are currently viewing सिंहाच्या वेशात गाढव

सिंहाच्या वेशात गाढव

एकदा एका गाढवाला सिंहाची कातडी सापडली. 

गाढवाने ती पांघरली आणि थाटात फिरू लागलं. 

इतर प्राणी त्याला सिंह समजुन तो दिसता क्षणी घाबरून दूर पळु लागले. 

गाढवाला मजा यायला लागली. 

आजवर कोणीही त्याला घाबरून पळालं नव्हतं. 

गाढव जंगलात सगळीकडे फिरून प्राण्यांना घाबरवु लागलं. 

फिरता फिरता गाढवाला एका कोपऱ्यात एक कोल्हा दिसला. 

गाढव त्याला घाबरवायला त्याच्या जवळ जाऊ लागलं. 

कोल्ह्याने सावध पवित्रा घेतला आणि सिंहाच्या वेषातल्या गाढवाकडे रोखुन बघु लागला. 

गाढवाला कोल्ह्याची हिम्मत पाहुन राग आला, इतर सर्व प्राणी त्याला पाहताक्षणी पळत सुटले होते. 

कोल्हा तितका घाबरलेला दिसत नव्हता. 

गाढव कोल्ह्याला अजुन घाबरावे म्हणुन जोरात ओरडला. 

गाढवाचा आवाज ऐकता क्षणी कोल्हा खो खो हसत सुटला. 

तो म्हणाला “अरे गाढवा, तू हा सिंहाचा वेष घेऊन आलास तर मी थोडा गोंधळलो होतो, मी तु अजुन जवळ आला असतास तर घाबरून पळालोही असतो. पण तु तोंड उघडलंस आणि आपलंच बिंग फोडलंस.”

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा