धनत्रयोदशीच्या नावात धन असले तरी या दिवसाचे महत्व धनाशी संबंधित नसुन आरोग्याशी आहे.
धन्वंतरी हि आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीला आयुर्वेदाचे जनक आणि सर्व देवांचे वैद्य समजले जाते.
आयुर्वेद शिकणाऱ्या आणि आयुर्वेदानुसार उपचार करणाऱ्या लोकांसाठी धन्वंतरी हि पूज्य देवता आहे.
काही लोक धन्वंतरीलाही विष्णूचेच रूप मानतात.
धन्वंतरी हे समुद्रमंथनातुन प्रकट झालेल्या दिव्य रत्नांपैकी एक होते. समुद्रमंथनाची सविस्तर कथा तुम्ही येथे वाचु शकता.
हा दिवस धन्वंतरीचा जन्मदिवस म्हणुन साजरा केला जातो. आता भारत सरकार या दिवसाला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा करते.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
खुप छान पद्धतीने माहिती दिलीत. खूपच सुंदर शब्द रचना केली आहे. सगळे सण मुलीला उत्तम प्रकारे समजाऊन सांगू शकले. धन्यवाद.