
एका गावात एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता.
एके वर्षी त्या गावात कडाक्याची थंडी पडली.
बर्फवृष्टीने सारे काही थिजुन गेले.
लोक आपापल्या घरात शेकोटी पेटवुन उब घेत असत.
एकदा तो शेतकरी काही कामासाठी घराबाहेर पडला.
घरी परतत असताना त्याला एक साप दिसला.
तो साप बर्फात गारठुन स्तब्ध झाला होता. त्याची हालचाल थांबली होती.
शेतकऱ्याला त्याच्यावर दया आली.
त्याने सापाला उचलले आणि घरी घेऊन गेला.
घरी गेल्यावर सापाला शेकोटीजवळ ठेवले.
शेकोटीची उब मिळाल्यावर सापाच्या अंगात शक्ति येऊ लागली.
शेतकरी दूध घेऊन सापाजवळ गेला.
तेवढ्यात सापाने त्याला दंश केला आणि वळवळ करत तेथुन निसटला.
सापाच्या विषाने शेतकरी मरण पावला.
विषारी सापावर आलेली दया शेतकऱ्याला चांगलीच महागात पडली.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take