You are currently viewing मुंगी आणि टोळ

मुंगी आणि टोळ

मुंगी फार मेहनती असते. 

त्या अतिशय मेहनतीने कण कण वाळु गोळा करून आपल्यासाठी वारूळ बनवतात. 

दूर दूर फिरून शिस्तीत कण कण अन्न गोळा करून वारुळात सुरक्षित ठेवतात. 

ही वारुळे आणि अंतरे त्यांच्या आकाराच्या मानाने प्रचंड असतात. 

हिवाळ्यात जेव्हा त्यांना अन्न मिळणे दुरापास्त होते त्यासाठी त्या आधीच उन्हाळ्यात राब राब राबुन अन्न साठवुन ठेवतात जेणेकरून पुढे उपासमार होऊ नये. 

त्यामानाने टोळ उनाड असतो. 

गुणगुणत नाचत रमत गमत इकडेतिकडे भटकत वेळ घालवत असतो. 

असंच एका टोळाची हिवाळ्यात उपासमार व्हायला लागली तेव्हा त्याने मुंगीकडे मदत मागितली. 

मुंगीने त्याला सुनावले “आम्ही जेव्हा राबत होतो तेव्हा तु नाचत उनाडक्या करत होतास. आता अन्न मिळत नाही म्हटल्यावर तु आमच्याकडे मदत मागतो आहेस. आम्ही का आमची मेहनत तुझ्यासारख्या आळश्यावर वाया घालवु? आता हा हिवाळाही असंच नाचत नाचतच घालव.”

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा