कोळी आणि छोटा मासा

एकदा एक कोळी गळ लावुन मासे पकडायला बसला होता. 

बराच वेळ होऊन गेला तरी त्याला एकही मासा मिळत नव्हता. 

कसाबसा एक छोटासा मासा त्याच्या गळाला लागला. 

तो मासा आपले प्राण वाचवण्यासाठी तडफडत होता. 

त्याने कोळ्याशी गोड बोलुन सुटकेचा प्रयत्न केला. 

तो म्हणाला “अरे माझा इवलासा आकार तरी बघ. मला पकडुन तुला काही मोठा फायदा होणार नाही. मला सोडुन दे.”

“आणखी काही दिवसांनी बघ, खाऊन खाऊन माझी तब्ब्येत सुधारेल. तेव्हा पकडशील तर काही फायदा आहे.” 

“आज मला जाऊ दे.”

कोळी काही त्याच्या गोड बोलण्याला भुलला नाही. 

तो म्हणाला, “अरे थोडं थोडं करतच आपली झोळी भरायची असते. मोठ्या माशाची वाट बघत बसलो तर मला आज काही मिळेल याचीही शाश्वती नाही आणि काही दिवसांनी तु परत माझ्या जाळ्यात अडकशील याचाही काय भरोसा? तेव्हा छोटा तर छोटा पण मी उद्यासाठी आजचा फायदा सोडणार नाही.”

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा