You are currently viewing श्री स्वामी समर्थ प्रकट कथा

श्री स्वामी समर्थ प्रकट कथा

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म असल्याचे मानतात. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भक्तांवर कृपा केली, अनेक चमत्कार केले. 

नदीचे मुळ आणि साधुचे कुळ विचारू नये असे म्हणतात. तरीही एकदा कोणीतरी स्वामींना त्यांचे नाव आणि ते कुठून आले असे विचारले होते. तेव्हा त्यांनी मी नृसिंहभान, श्रीशैलम जवळच्या कर्दळी वनातुन आलो असल्याचे सांगितले. 

त्यांची प्रकट होण्याची कथा अशी आहे: 

श्रीशैलमला महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे. तेथे जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्षे एकाच जागेवर तपश्चर्या केली. खुप वर्षे तिथे असल्यामुळे त्यांच्या अवतीभवती झाडे, वेळी आणि मुंग्यांचे भलेमोठे वारूळ तयार झाले होते. 

एकदा उद्धव नावाचा लाकूडतोड्या तिथली झाडे आणि ते वारूळ तोडून साफ करत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार स्वामींच्या मांडीवर बसला आणि त्यांना रक्त यायला लागले. ते जागृत झाले आणि वारूळातून बाहेर आले. 

अशा तपस्वी माणसाला आपल्याकडुन कुऱ्हाड लागल्यामुळे तो लाकूडतोड्या घाबरला आणि क्षमायाचना करायला लागला. स्वामींनी त्याला क्षमा केली आणि अभय दिले. 

आता यानिमित्ताने जागृत झाल्यावर स्वामींनी आपली तपश्चर्या संपन्न करून पुन्हा लोकांमध्ये जाऊन भक्तांवर कृपा करण्याचे ठरवले. 

श्रीशैलमहून ते भारतभर भ्रमण करून अक्कलकोटला आले. तेथेच त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य भक्तांना सदासर्वदा त्यांच्या कार्यात बळ देते, भीती आणि संकटावर मात करण्याचा विश्वास देते. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा