एकदा एका कावळ्याला मोराची काही पिसे सापडली.
मोराच्या सौंदर्याचा आणि सुंदर पिसाऱ्याचा कावळ्याला नेहमी हेवा वाटत असे.
त्याला ती पिसे पाहुन एक विलक्षण कल्पना सुचली.
त्याने ती पिसे स्वतःच्या पिसांमध्ये खोचली आणि आनंदाने मिरवु लागला.
इतर कावळ्यांसमोर शेखी मिरवायला लागला. त्यांना वाकुल्या दाखवायला लागला.
त्याला स्वतःच्या या नव्या रूपाचं एवढं कौतुक वाटु लागलं कि त्याला थेट मोरांमध्येच सामील व्हायची इच्छा झाली.
तो मोरांकडे गेला.
मोरांना मात्र कावळ्याने त्यांच्यातल्या एखाद्याची पडलेली पिसे कावळ्याने आपली म्हणुन मिरवल्याचा फार राग आला.
त्यांनी कावळ्याला पकडुन त्याची पिसे ओढुन काढली, त्यात त्याची स्वतःची पिसेसुद्धा निघाली.
कावळा वेदनेने ओरडला.
आता मोरांची आणि स्वतःची दोघांची पिसे गेल्यामुळे तो फारच विद्रुप दिसायला लागला.
निराश होऊन तो पुन्हा कावळ्यांमध्ये परतला, पण त्याची हि दशा पाहुन सर्वांनी त्याची टर उडवली.
आपल्या भाईबंधूंना कमी लेखुन, मोरांमध्ये जाऊन अपमान करवुन आल्यामुळे त्याला त्यांनी कळपाबाहेर हाकलले.
मोर व्हायच्या प्रयत्नात कावळा आपला स्वतःचा कळप हरवुन बसला.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take