You are currently viewing ससे आणि बेडुक

ससे आणि बेडुक

सशांना नेहमीच घाबरून जगावं लागतं. 

कुठल्याही शिकाऱ्याची चाहुल लागली कि जीव मुठीत घेऊन पळत सुटावं लागतं. 

असं सतत घाबरण्याला ससे एक दिवस कंटाळले. 

सगळ्यांनी मिळुन ठरवलं कि आपण आता हे जंगल सोडुन जाऊया. 

अशी जागा शोधूया जिथे आपल्याला कोणाला घाबरून राहावं लागणार नाही. 

सगळे दुडूदुडू पळत निघाले. 

पळता पळता ते नदीकाठी आले. 

तिथे बेडकं बसलेली होती. 

अचानक एवढे ससे पळत आल्यामुळे बेडुक दचकले आणि टणाटण पाण्यात उड्या मारायला लागले. 

त्या बेडकांना पाहुन एक ससा थबकला. 

त्याने विचार केला आपण लहान प्राणी म्हणुन सगळ्यांना घाबरत पळतो. 

पण हे बेडूक आपल्यापेक्षाही लहान आहेत आणि ते आपल्याला घाबरत आहेत. 

म्हणजे सगळ्यांना घाबरणाऱ्या आपल्यासारख्यानाही घाबरणारे कोणीतरी आहेत. 

याचा अर्थ जिथे कोणी कोणाला घाबरणार नाही अशी जागा नाहीच. 

आपल्याला सावध राहणं हाच एक मार्ग आहे. 

त्याने हा विचार सर्वांना सांगितला आणि त्यांनी जंगल सोडण्याचा विचार रद्द केला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा