एकदा एक कोंबडा आणि कुत्रा सोबत जंगलात फिरत होते.
वाटेत ते आराम करायला एका मोठ्या झाडाखाली थांबले.
कुत्रा झाडाखाली पाय पसरून झोपून गेला.
कोंबडा झाडावर चढुन काही खायला मिळतंय का बघायला लागला.
तेवढ्यात दुसरीकडून एक कोल्हा आला.
त्याला कोंबड्याला खाण्याची इच्छा झाली.
कोंबडा मात्र उंच फांदीवर कोल्ह्याच्या टप्प्याबाहेर होता.
कोल्ह्याने जरा चतुराईने कोंबड्याला फसवायचे ठरवले.
तो कोंबड्याशी गोड गोड बोलुन त्याची स्तुती करायला लागला.
त्याला आपल्या सोबत चलण्याची विनंती करायला लागला.
कोंबडा त्याची लबाडी ओळखुन होता.
त्याने कोल्ह्याला सांगितले “ठीक आहे, जाऊया आपण तू म्हणतोयस तिथे, पण माझा सेवक या बाजूला झोपला आहे, त्याला उठव आणि तयारी करायला सांग, मग आपण जाऊ.”
कोल्हा खुश झाला आणि कुत्रा झोपला होता त्याबाजूला गेला.
कोल्हा जवळ येताच कुत्रा जागा झाला आणि त्याने कोल्ह्यावर झडप घालुन त्याला ठार केले.
आपल्या सावधपणामुळे कोंबड्याच्या जीव वाचला.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take