एकदा बादशहा अकबर आणि त्याचे दरबारी नदीकिनारी फेरफटका मारायला गेले होते.
अकबराला त्यांची परीक्षा घेण्याची एक वेगळीच कल्पना सुचली.
अकबराने एक काठी घेतली आणि वाळूमध्ये एक रेष काढली.
मग तो दरबाऱ्यांना म्हणाला जो कोणी मी काढलेल्या रेषेला हात न लावता, काही न करता छोटी करून दाखवेल त्याला मी बक्षीस देईन.
सर्व दरबारी शक्कल लढवण्याचा प्रयत्न करू लागले. रेषेला लहान करणे तर सोपे होते पण तिला हात न लावता, काही न करता कसे करायचे हे मात्र कोणाला कळत नव्हते.
शेवटी बिरबल पुढे आला. त्याने काठी घेतली आणि अकबराने काढलेल्या रेषेच्या बाजूला त्याहून मोठी रेष काढली.
मग तो अकबराकडे वळुन म्हणाला, “हुजूर, आता मी काढलेल्या रेषेच्या तुलनेत तुमची रेष छोटी दिसते. आणि तुम्ही काढलेली रेष जशीच्या तशी आहे.”
अकबर बिरबलाच्या युक्तीवर खुश झाला आणि त्याला बक्षीस दिले.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take