ऐका श्री महादेवा, तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब सवाष्ण बाई राहत होती. तिने दर श्रावणात एक व्रत केलं.
दर सोमवारी पहाटेस उठायची. स्नान करायची, पूजा करायची.
एक उपडा, दुसरा उताणा, पसाभर तांदूळ घ्यायची आणि महादेवाच्या देवळी जाऊन श्रद्धेने पूजा करायची.
नंतर प्रार्थनेच्या वेळीं, ‘जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी’ असं म्हणून महादेवाच्या मस्तकीं तांदूळ अर्पण करायची.
उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून परत घरी यायची.
असं चारी सोमवारीं तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला.
दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली.
पुढं उद्यापनाचे वेळीं तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ति केली.
महादेवांनी तिला निरोप पाठविला. “अजून तुला, नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाहीं, माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे.”
पुढं महादेवांनी तिला अपार देणं दिलं.
तर जसा तिला भोलेनाथ प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो.
ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take