एका माणसाला एक जादूची कोंबडी सापडली. ती कोंबडी त्याला रोज सोन्याचं एक अंडं द्यायची. सोन्याच्या अंड्यांमुळे तो श्रीमंत झाला.
एक दिवस त्याची बायको त्याला म्हणाली, “किती दिवस आपण रोज असं एक एक अंड्याची वाट बघत बसणार? हि कोंबडी सोन्याचं अंडं देते म्हणजे हिच्या पोटात बरंच सोनं असेल. आपण तिला मारून ते सगळं सोनं काढुन घेऊ.”
त्या माणसालाही अजुन सोन्याची हाव सुटली. त्याने त्या कोंबडीला मारले आणि बघितले तर तिच्या आतमध्ये काही सोने नव्हते. ती कोंबडी जादुने सोन्याचे अंडे देत होती हे त्याला समजले.
आता त्याला रोज एक अंडे मिळत होते तेही बंद झाले. तो माणुस आपल्या डोक्याला हात लावुन आपल्या कर्माला दोष देत बसला.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take