You are currently viewing कोल्हा आणि करकोचा

कोल्हा आणि करकोचा

एकदा कोल्ह्याने करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलावले. 

खरं तर कोल्ह्याचा करकोच्याची चेष्टा करायचा करण्याचा उद्देश होता. 

करकोचा एक पक्षी असतो. करकोच्याची चोच फार लांब असते. 

करकोचा कोल्ह्याच्या घरी आला. 

कोल्ह्याने जाणुनबुजुन खीर केली आणि ती उथळ भांड्यात वाढली. 

करकोच्याला आपल्या चोचीने त्या उथळ भांड्यातुन खाता आले नाही. 

कोल्ह्याने त्याची मजा बघत आपली खीर संपवली. 

मग “अरे तुला आज विशेष भूक नाहीये वाटतं, केवढी खीर उरली आहे.” असे म्हणुन करकोच्याची खीर पण स्वतःच संपवली. 

करकोचा बिचारा उपाशीच घरी गेला. 

काही दिवसांनी त्याने कोल्ह्याची परतफेड करायचे ठरवले. त्याने कोल्ह्याला घरी जेवायला बोलावले. 

करकोचानेसुद्धा खीर केली पण ती दोघांना उंच सुरयांमध्ये वाढली. 

सुरई उंच आणि निमुळत्या तोंडाची असल्यामुळे कोल्ह्याला आपले तोंड त्यात घालुन ती खाताच आली नाही. 

करकोचाने मात्र सहज आपली लांब चोच सुरईत घातली आणि मजेत खीर खाल्ली. 

मग कोल्ह्याला “अरे आज तुला जास्त भूक नाहीए वाटतं” असे म्हणुन त्याची पण खीर खाल्ली. 

यावेळी कोल्हा उपाशी पोटी घरी गेला. 

करकोचाने त्याच्याच पद्धतीने “जशास तसे” करून त्याची खोडी परतवली होती.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा