एक कुत्रा होता.
त्याला एकदा एक मांसाचा तुकडा मिळाला.
तो तुकडा घेऊन तो नदी किनाऱ्याने जात होता.
त्याला नदीत आपले प्रतिबिंब दिसले.
त्याला तो दुसरा कुत्रा वाटला, आणि त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपल्यापेक्षा भारी आहे असे वाटले.
त्याने त्या पाण्यातल्या कुत्र्याशी भांडायला म्हणुन भुंकायला सुरुवात केली.
भुंकायला तोंड उघडताच त्याच्या तोंडातील मांस नदीत पडले आणि वाहुन गेले.
हताश होऊन तो कुत्रा आणि प्रतिबिंबातला कुत्रा फक्त एकमेकांकडे बघत बसले.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take