You are currently viewing शेतकरी आणि करकोचा

शेतकरी आणि करकोचा

एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. 

त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. 

शेतकरी आल्यावर त्या करकोच्याने त्याला विनंती केली कि मी काही तुझं पीक चोरून खायला आलो नव्हतो आणि मी एकही दाना खाल्ला नाही, पण तरी इथे जाळ्यात अडकलो आहे. 

शेतकरी म्हणाला “तू म्हणतोस तसा तू निर्दोष असशीलही, पण तु इतर चोरांसोबत पकडला गेला आहेस. त्यामुळे त्या चोरांसारखीच तुलाही शिक्षा मिळेलच.”

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा