You are currently viewing कुत्रा आणि लांडगा

कुत्रा आणि लांडगा

एकदा एक पाळीव कुत्रा गावाबाहेर फिरत होता. 

त्याला एक लांडगा भेटला. 

लांडग्याने कुत्र्याला पाहुन त्याच्या गुटगुटीत तब्येतीचं कौतुक केलं. त्यामानाने लांडगा बराच बारीक होता. 

कुत्र्याने सांगितले कि त्याचा मालक त्याला किती चांगला ठेवतो, चांगलं चांगलं खायला घालतो, त्यामुळेच त्याची तब्येत इतकी छान राहते. 

त्याने लांडग्याला त्याच्या घरी राहायला यायचे आमंत्रण दिले. 

लांडगा त्याच्यासोबत निघाला. पण त्याला कुत्र्याच्या गळ्याभोवतीच्या त्वचेवर इतर अंगाच्या मानाने केस कमी आहेत हे जाणवले. 

त्याने कुत्र्याला विचारले. 

कुत्रा म्हणाला “अरे घरी असताना मला मालक पट्ट्याने बांधुन ठेवतो. त्यामुळे तिथले केस कमी झालेत, त्यात एवढं काही विशेष नाही.”

आता मात्र लांडग्याचा विचार बदलला, तो म्हणाला “मित्रा, चांगलं खायला मिळावं म्हणुन आपलं स्वातंत्र्य गमवावं मला वाटत नाही. हि तर फारच मोठी किंमत झाली.” 

असं म्हणुन लांडगा परत गेला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा