एका जंगलात एका सिहांचे राज्य होते.
एका दिवशी तो सिह मेला.
त्याच्यानंतर राजा कोणी व्हावे हे ठरवण्यासाठी प्राण्याची सभा भरली.
माकड आणि कोल्हा निवडणुकीला उभे राहिले. दोघांचे भाषण झाले.
माकडाने कोल्ह्यापेक्षा खुप छान भाषण केले . सगळ्याचे मनोरंजन करून सगळयांना प्रभावित केले.
प्राण्यानी एक मताने माकडाला निवडून दिले.
माकड राजा झालेला बघुन कोल्ह्याचा जळफळाट झाला.
कोल्ह्यने माकडाला धडा शिकवण्यचे ठरवले.
कोल्हा एक दिवस माकडाकडे जाउन म्हणाला, “महाराज, तुम्ही आता साध्यासुध्या झाडाच्या फांदीवर राहता, ते काही चांगले वाटत नाही.”
“मी तुमच्या थाटाला शोभेल असे एक झाड शोधुन काढले आहे .एवढे मोठे झाड आहे. त्याची फळंसुद्धा छान आहेत. तुम्ही तिथे अगदी थाटात राहाल. चला माझ्यासोबत.”
माकड आनंदात कोल्ह्यच्या मागे मागे निघाले.
कोल्ह्याने चतुराईने त्याला एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकवले.
माकड अडकले आणि “कोल्ह्यने मला धोका दिला” असे म्हणून ओरडायला लागले.
कोल्हा म्हणाला “एवढा मूर्ख आणि लोभी प्राणी आमचा राजा व्हायचा लायकीचा नाही” आणि निघुन गेला.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take