You are currently viewing कंजूष माणसाचे सोने

कंजूष माणसाचे सोने

एका गावात एक कंजुष माणुस राहत असे. 

तो कुठल्याही गोष्टीवर खर्च करायला सहजासहजी तयार होत नसे. 

आपला पैसे तो जीवापाड प्रेमाने सांभाळत असे. 

एकदा त्याने आपली सर्व पुंजीच्या मोबदल्यात त्या किमतीचे सोने घेतले. 

ते सोने त्याने एका खास ठिकाणी पुरून ठेवले. 

त्या सोन्यावर त्याचे इतके प्रेम होते कि तो रोज ते उकरून काढुन त्याच्याकडे बघत बसे आणि मन भरून बघितल्यावर परत पुरून ठेवत असे. 

गावातल्या काही बदमाश लोकांनी त्याचा हा दिनक्रम ओळखुन त्याच्यावर पाळत ठेवली आणि सोन्याची जागा हेरली. 

एक दिवस त्यांनी ते सोने चोरून नेले. 

दुसऱ्या दिवशी त्या कंजूष माणसाने ती जागा खणली आणि त्याला सोने गेल्याचे लक्षात आले तेव्हा तो मोठमोठ्याने रडू लागला. 

त्याचा शेजारी त्याला बघायला आला आणि त्याची हकीकत ऐकुन त्याला म्हणाला “एवढे कशाला रडतोस? तुला त्या सोन्याची फार आठवण येत असेल तर त्याजागी दगड पूर आणि आपला दिनक्रम चालु ठेव. तिथे सोने असले काय आणि दगड असले काय तू ते वापरत तर अजिबात नव्हतास. त्याचा तुला काही उपयोगही नव्हता. आपल्या मनाचं फक्त समाधान करून घे.”

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा