एकदा कबुतरांनी गरुडाला घाबरून आपले संरक्षण करण्यासाठी एका घारीला आपल्या कळपाचे प्रमुख म्हणुन नेमले.
घारीने याचा फायदा घेतला. एक एक कबुतराला आपल्याला भेटण्याचा आदेश देऊन ती त्यांना मारून खात असे.
गरुडापेक्षा जास्त कबुतरांना त्या घारीने मारले.
कबुतराला हे लक्षात आले तेव्हा त्यांना पश्चाताप झाला, पण आता फार उशीर झाला होता.
“रोगापेक्षा इलाज भयंकर”