मराठी गोष्टी

बैल आणि डास

बैल आणि डास

एकदा एक डास बैलाच्या शिंगावर जाऊन बसला. 

बैल शांतपणे माळरानातुन फिरत होता. 

थोड्यावेळाने डास शिंगावरून उठला. 

बैलाला म्हणाला "आता मी शिंगावरून उठतो दादा, तुम्हाला फार ओझं झालं असेल नाही?"

जाहिरात

बैल म्हणाला "उठ नाहीतर बैस. कसलं ओझं? तु शिंगावर येऊन बसला आहेस हे हि मला समजलं नव्हतं." 

डास खजील झाला. 

तात्पर्य: आपल्याला आहोत त्यापेक्षा फार मोठं समजु नये. 

जाहिरात