एक कासव होते. ते फारच बडबडे होते.
पाण्यात असो कि पाण्याबाहेर, ते सतत इतरांशी गप्पा मारण्यात मग्न असे.
त्याची एकदा दोन पक्ष्यांशी मैत्री झाली.
त्यांच्याशीही कासव भरपूर गप्पा मारत असे.
त्याने त्या पक्ष्यांना मला कधी तुमच्यासोबत उडायला घेऊन चला असा आग्रह केला.
पण कासव कसे उडणार? म्हणुन ते पक्षी काही तयार होत नसत.
कासवाने मात्र अनेक दिवस आपला आग्रह चालुच ठेवला.
ते पक्षी भेटले कि कासव उडण्याबद्दल बडबड सुरु करत असे.
शेवटी त्याला कंटाळुन ते पक्षी तयार झाले.
कासव जड असल्यामुळे त्यांना एकट्याला घेऊन उडणे शक्य नव्हते.
त्यांनी कासवाला घेऊन उडण्यासाठी एक शक्कल लढवली.
ते एक जाड फांदी घेऊन आले.
त्यांनी कासवाला सांगितले कि त्याने फांदीला मध्यभागी तोंडाने पकडावे आणि ते दोघे एकेक टोक पकडतील आणि ती फांदी घेऊन उडतील.
कासव तयार झाले.
पक्ष्यांनी कासवाला ताकीद दिली कि त्याला उडताना अजिबात बोलता येणार नाही, नाही तर फांदी तोंडातुन सुटेल.
कासवाने ते मान्य केले.
ठरल्याप्रमाणे ते पक्षी कासवाला फांदीवर घेऊन उडाले.
ते एका गावावरून जात असताना हे विचित्र दृश्य पाहुन लोक हसायला लागले, ओरडायला लागले.
त्यांचा आरडाओरडा ऐकुन कासवाला राहवले नाही, त्यांने उत्तर द्यायला तोंड उघडले आणि व्हायचे तेच झाले. कासव फांदीवरून सुटले, खाली जमिनीवर येऊन आपटले आणि मेले.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take