You are currently viewing एकादशी : मूर राक्षसाचा वध

एकादशी : मूर राक्षसाचा वध

एक मुर नावाचा बलाढ्य राक्षस होता. 

तो प्रचंड पराक्रमी होता. 

देवांना त्याला हरवण्यात यश येत नव्हतं. 

त्याचे अत्याचार वाढत चालले होते. 

देवांनी भगवान विष्णूंकडे त्याचे पारिपत्य करण्याची विनंती केली. 

श्रीविष्णूंनी मूर राक्षसाशी युद्ध सुरु केले. 

मूर राक्षसाने साक्षात नारायणाला दीर्घ काळ लढवत ठेवले.  

लढून लढून विष्णु विश्रांतीसाठी बद्रीनाथजवळ एका गुहेत जाऊन झोपले. 

मुर राक्षसाने विष्णूंचा पाठलाग केला. 

विष्णूंना झोप लागल्यावर मूर राक्षसाने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. 

पण तेव्हाच श्रीविष्णूंच्या शरीरातुन एक देवी प्रकट झाली. मूर राक्षस चमकला. 

तिने झोपेत विष्णूंना मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मूर राक्षसाचा तात्काळ वध केला. 

विष्णूंना जाग आली. ते देवीवर प्रसन्न झाले. 

त्या दिवशी एकादशी होती. त्यामुळे त्यांनी त्या देवीला एकादशी देवी हेच नाव दिले. 

तसेच ह्या दिवशी जो कोणी व्रत करेल त्याला विशेष फळ मिळेल असे सांगितले. 

कार्तिक कृष्णपक्षातल्या एकादशीला त्यादिवशी देवी एकादशी देवी उत्पन्न झाल्यामुळे  उत्पन्ना एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी म्हणतात. 

एकादशी देवीबद्दलच यासारखीच एक पौराणिक कथा: एकादशी : मृदुमान्य वध

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा