कालिदासाचा मानला जाणारा एक संस्कृत श्लोक आम्हाला शाळेत अभ्यासक्रमात होता.
त्याची कथा अशी, कि राजा भोजाने एकदा आपल्या एका सेविकेच्या हातुन पाण्याची घागर निसटुन पडताना पाहिले. ती पडताना जो आवाज झाला त्यावरून त्याला एक गंमत सुचली.
त्यादिवशी त्याने दरबारात “ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:” एवढी एक ओळ देऊन त्यावर श्लोक रचुन दाखवण्याचे आव्हान दिले. कोणालाही ह्या ओळीचा अर्थ कळत नव्हता त्यामुळे त्यावरून पुढे श्लोक रचण्याचा प्रश्नच नव्हता.
कालिदासाने ती ओळ ऐकुन तो भांड्याचा आवाज ओळखला आणि त्यावर आपली कल्पनाशक्ती वापरून एक रामायणात एक काल्पनिक प्रसंगावर श्लोक रचला.
रामाभिषेके जलमाहरंत्या। हस्ताच्युतो हेमघटो युवत्या:।।
सोपानमार्गेण करोती शब्दम। ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:।।
म्हणजे रामाच्या अभिषेकासाठी एक युवती एक घट म्हणजे घागर आणत होती. तिच्या हातुन तो निसटला आणि सोपान मार्गावर म्हणजे जिन्यावर त्या भांड्याचा आवाज झाला ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:.
कालिदासाच्या या कल्पनेवर राजा प्रसन्न झाला आणि त्याने कालिदासाला बक्षिस दिले.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take