बोधकथा म्हणजे अशा गोष्टी ज्यातुन मनोरंजनासोबतच आपल्याला काही बोधही मिळतो. कथेच्या माध्यमातुन काही चांगली शिकवणुक देणे हा प्रयत्न माणसाच्या आणि साहित्याच्या इतिहासात सतत चालु आहे.
पंचतंत्र, इसापच्या नीतिकथा, अकबर बिरबलाच्या काही गोष्टी, आपल्या पुराणातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या अशाच स्वरूपाच्या आहेत.
ह्या गोष्टी फक्त लहान मुलांनीच किंवा त्यांच्यासाठीच वाचाव्या असं नाही. अनेकदा मोठ्या माणसांनासुद्धा साध्या सोप्या मूल्यांचा, शिकवणुकीचा विसर पडतो. तर ह्या गोष्टींच्या निमित्ताने आपल्यालाही एखादी छोटीशी गोष्ट नव्याने शिकायला मिळाली तर छानच, हो कि नाही? :-)
- Go to the previous page
- 1
- …
- 4
- 5
- 6
- 7