एकदा एक वाघ शिकारीच्या शोधात होता. त्याला एक कोकरू चरताना दिसले.
कोकराचे लक्ष नव्हते.
वाघ दबा धरून बसला. आणि काही क्षणात कोकरावर झडप घातली.
पण त्याच क्षणी एक सिंह सुद्धा त्या कोकरावर झेपावला होता.
दोघांच्या हल्ल्यात कोकरू लगेच मेले.
पण त्या कोकराचे मांस कोण खाणार यावरून दोघांचे भांडण सुरु झाले.
दोघे चवताळले होते. एकमेकांवर धावुन जात जोरजोरात चावे आणि फटकाऱ्यांनी प्रहार करत होते.
थोड्याच वेळात दोघेही रक्तबंबाळ झाले, आणि थकले.
दोघांनी जरा शांत होऊन दम घेत कोकराकडे पाहिले.
त्यांचं भांडण चालु असताना एका कोल्ह्याने कोकराच्या मांसावर ताव मारला होता.
आता तिथे फक्त हाडे शिल्लक राहिली होती.
त्यांचं भांडण शांत होता क्षणी कोल्ह्याने तिथुन धुम ठोकली.
पण त्या जखमी अवस्थेत कोल्ह्याचा राग येऊनही वाघ आणि सिंह दोघांमध्ये त्याला पकडण्याची शक्ती नव्हती.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take