एक व्यापारी पाळीव प्राणी आणि पक्षी विकत असे. त्याच्याकडे एकदा खुप हुशार पोपट विकायला होते. व्यापाऱ्याने ग्राहकांना आकर्षित करायला त्या पोपटांना काही लहान वाक्ये बोलायला शिकवली होती. ह्या वैशिष्ट्यामुळे ते पोपट लगेच विकले गेले.
तो व्यापारी अधुन मधुन त्याने विकलेल्या प्राण्यांच्या घरी जात असे. त्यांची काळजी घेण्यात काही अडचण असेल तर मालकांना मार्गदर्शन करत असे. त्यांना प्राण्यांचे खाद्य, देखभालीचे साहित्य इ. विकत असे.
असाच तो हे पोपट विकल्यावर काही दिवसांनी त्यांच्या घरी गेला. पहिल्या पोपटाच्या घरी गेला तेव्हा त्या पोपटाने त्याला खुप शिव्या दिल्या. त्याचा मालक बाहेर आला आणि तोही व्यापाऱ्यांशी तुसडेपणाने बोलला आणि त्याला लवकरच हाकलुन लावले.
तिथुन पुढे तो दुसऱ्या पोपटाच्या घरी गेला. तेव्हा त्याने चांगल्या शब्दात व्यापाऱ्याचे स्वागत केले. मालक आला, त्यानेहि मालकाची विचारपूस केली. त्याला प्यायला पाणी आणि दिले आणि काही खायलाही दिले. पोपटाने व्यापाऱ्याला काही श्लोक म्हणुन दाखवले.
प्रसन्न होऊन व्यापारी पुढे निघाला. मनोमन त्याने विचार केला “नुसती पोपटपंची करणाऱ्या पक्ष्यांवर सुद्धा संगतीचा हा परिणाम होत असेल तर माणसांवर आणि अजाणत्या मुलांवर तर काय होत असेल?”
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
Thanks akash for the wonderful story
धन्यवाद केशव 🙂