रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा अतिशय महत्वाचा सण आहे. अल्लाहने प्रेषितांना याच महिन्यात कुराणाचा संदेश दिला.
मुस्लिम धर्मीय संपुर्ण रमजान महिन्यात रोज उपवास करतात. सूर्योदयाच्या आधी सुरु होऊन सूर्यास्तानंतरच हा उपवास संपतो. या दरम्यान काहीही खाल्लेले किंवा पिलेलेही चालत नाही. या कडक उपवासाला रोजा म्हणतात.
संध्याकाळी नमाज पढल्यानंतरच हा उपवास सोडला जातो. प्रार्थनेनेनंतर सगळेजण एकत्र येऊन उपवास सोडतात आणि आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. याला इफ्तार म्हणतात.
या महिन्यात कुठलीही करमणूक न करता फक्त उपवास आणि अल्लाहवर लक्ष केंद्रित करत प्रार्थना करणे अपेक्षित आहे.
रमजाननंतर शव्वाल हा महिना सुरु होतो. त्याच्या सुरुवातीला हि ईद असते. या दिवशी उपवास करत नाहीत. मुस्लिम धर्मियांचे हिजरी कालमापनसुद्धा चंद्रावर आधारित आहे. परंतु यात चंद्र दिसण्याला फार महत्व आहे. काही कारणाने जर संध्याकाळी चंद्र दिसला नाही तर ईद पुढे ढकलली जाते.
ईदच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना भेटी देऊन सोबत आनंदाने साजरा करतात. एकमेकांच्या गळाभेटी घेऊन “ईद मुबारक” अशा शब्दात शुभेच्छा देतात. या दिवशी उपवास करत नाहीत.
ईदच्या दिवशी “जकात” म्हणजे गरिबांना काही दान देणे हे महत्वाचे कार्य समजले जाते. याच सणाचे दुसरे नाव “ईद-उल-फित्र” असे आहे. फित्र म्हणजे दानधर्म.
ईद च्या दिवशी मुस्लिम धर्मियांच्या घरी “शीरखुर्मा” हा खिरीसारखा दूध आणि सुका मेवा वापरून पदार्थ बनवला जातो. मोठे लहान मुलांना “ईदी” म्हणजेच खाऊसाठी पैसे किंवा काही भेटवस्तु वगैरे देतात.
भारतात एक गेल्या काही वर्षात सुरु झालेली परंपरा म्हणजे सलमान खानचे चित्रपट. सलमान खान आपल्या चाहत्यांना ईदची भेट म्हणुन आवर्जून आपल्या चित्रपटांना ईदच्या दिवशी प्रदर्शित करतो. ईद, सलमानचे चित्रपट, तुफान गर्दी हे सध्याचे समीकरण बनलेले आहे.
ईदच्या निमित्ताने हे वाचणाऱ्या सर्वांना ईद मुबारक!!
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
छान..
धन्यवाद 🙂