You are currently viewing मूर्ती वाहणारे गाढव

मूर्ती वाहणारे गाढव

एकदा एक मूर्तिकार त्याने बनवलेली देवाची मूर्ती त्याच्या गाढवावर लादुन चालला होता. 

मूर्ती अतिशय सुंदर होती. 

रस्त्याने जाता जाता लोकांना मूर्तीचे दर्शन होऊन आनंद होत होता. 

मूर्तिकाराच्या अप्रतिम शिल्पाचे कौतुक करत आणि देवाकडे पाहुन भावुक होत लोक नतमस्तक होत होते. 

सगळे आदराने वाकुन नमस्कार करत होते. 

एवढे कौतुक आणि आदर पाहुन गाढवाला आनंद झाला. 

त्याला वाटले आज इतक्या दिवसांनी लोकांना त्याचे कौतूक वाटत आहे. 

तो ह्या सन्मानाचा मनमुराद आनंद घेऊ लागला. 

ह्या आनंदाच्या भरात त्याचा वेग कमी होऊ लागला. 

त्याला आजची वेळ पूर्ण साजरी करायची होती. 

त्याच्या मालकाने दोन तीनदा त्याला आवाज देऊन पुढे चालायला सांगितले. 

गाढवाची तिथुन निघण्याची इच्छाच होत नव्हती. 

त्याचं पाऊल पुढे पडत नव्हतं. 

शेवटी गाढवाला मालकाचा रट्टा बसला. 

“अरे मुर्खां, लोक कशाला नमस्कार करत आहेत हे तरी समजुन घे. तुझ्यावरच्या मूर्तीला आदर दाखवत आहेत लोक. माणसाने गाढवाला वाकुन नमस्कार करावा एवढे वाईट दिवस नाही आले अजुन.”

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा