एकदा एक माशी मुंगीसमोर फुशारक्या मारत होती.
“मला जे वाटेल ते मी खायला जाते. वाटेल तिथे जाऊन बसते. देवाचा नैवेद्य मी देवाला दाखवण्याआधी चाखुन येऊ शकते. राजाच्या डोक्यावर जाऊन बसु शकते. कोणालाही मला काही करता येत नाही.”
मुंगीने हे ऐकुन घेतलं आणि म्हणाली.
“अशा वाटेल तिथे मिळेल ते जाऊन खाण्यात कसला आलाय मोठेपणा? जशी तू अन्नावर जाऊन बसतेस तशी रस्त्यावर शेणात सुद्धा जाऊन बसतेस. त्यापेक्षा आमच्यासारखी मेहनत करून सगळ्यांनी मिळुन अन्न शोधणे, वारुळे बनवणे, त्यात अन्न जपुन ठेवणे कधीही चांगले.”
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take