महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाबद्दल तर सर्वाना माहितच आहे.
गांधीजींची मिठाशी संबंधित आणखी एक छोटीशी गोष्ट आहे, आणि ती खारट नव्हे तर चक्क गोड आहे.
एकदा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधींना डॉक्टरांनी आरोग्य सुधारण्यासाठी मीठ सोडायला सांगितले.
मीठ हा आपल्या आहारातला अविभाज्य घटक आहे. त्यानेच पदार्थांना चव येते.
अर्थातच मीठ सोडणे फार कठीण आहे.
मीठ कसे सोडणार हा कस्तुरबांना प्रश्न पडला होता. त्यांची मनाची तयारी होत नव्हती.
महात्मा गांधींनी त्यांच्यासाठी म्हणुन स्वतःही काही दिवस मीठ सोडायचे ठरवले.
नवराही बिना मिठाचे अळणी जेवण घेत असल्यामुळे तसाच स्वयंपाक करणे आणि त्यांच्या सोबत जेवणे कस्तुरबांसाठी सोपे गेले.
आपल्या पत्नीसाठी अवघड वाटणारी गोष्ट स्वतः त्यांच्यासोबत करून, त्यांच्यासाठी आहारातल्या चवीचा त्याग करून गांधीजींनी आपलं प्रेम आणि नात्यातला दाखवुन दिला.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take