इसापनीति हा एक प्रसिद्ध बोधकथांचा संग्रह आहे. शेकडो वर्षांपूर्वी ग्रीसच्या एका प्रदेशात इसाप नावाचा एक गुलाम होता. तो अतिशय हुशार आणि ज्ञानी होता. प्राणी पक्षी यांना गोष्टींमध्ये बोलतं करून त्यांच्या माध्यमातुन काही तरी बोध देत गोष्टी रंगवुन रंगवुन सांगणे हि त्याची कला होती.
इसाप खरंच होऊन गेला का, कि तो स्वतः एक दंतकथा आहे याबद्दल वेगवेगळी मते आहेत. काही लोक अजूनही त्याचा अभ्यास करतात. इसापनिती मध्ये येणाऱ्या सगळ्याच गोष्टी त्याने सांगितल्या अथवा लिहिल्या का याबद्दलही खात्रीशीर माहिती नाही. कारण शतकानुशतके ह्या गोष्टी प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला सांगितल्या. तेव्हा त्यात भर पडत गेलेली असणे साहजिक आहे.
पण त्या तपशिलात न पडता गोष्टींचा आनंद घेऊया. कारण लिहिणारा इसाप असो किंवा आणखी कोणी, ह्या गोष्टी वाचुन मजा तर येतेच आणि बोधही होतो.