You are currently viewing बंदिस्त सिंह

बंदिस्त सिंह

एकदा एका सिंहाला सर्कशीसाठी जाळे लावुन पकडले. तो पकडला गेल्यावर त्याला पिंजऱ्यात बंद केले आणि ती माणसे आणखी प्राणी पकडण्यासाठी जंगलात गेली. 

सिंहली पिंजऱ्यात अडकलेले पाहुन कोल्ह्याला गंमत वाटली. तो पिंजऱ्यासमोर येऊन सिंहाला वाटेल ते बोलु लागला. अंगविक्षेप करत त्याला चिडवु लागला. 

सिंहाने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी कोल्हाही शांत झाला. 

मग सिंह म्हणाला “कोल्ह्या, तुला चांगलेच माहित आहे कि हेच चाळे जर तु मी मोकळा असताना केले असतेस तर एव्हाना तू जिवंतही राहिला नसतास. मी पिंजऱ्यात आहे म्हणुनच तुझी हि हिंमत होतेय. माझी परिस्थितीच अशी आहे. आता मी तुझ्यावर बसल्या जागी चिडुन गर्जना करण्यात कशाला शक्ती घालवु?” 

सिंहाला चिडवुन काहीच होत नाही हे पाहुन कोल्ह्याचा चिडवण्यातला रस गेला आणि तो निमूटपणे निघुन गेला.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा