You are currently viewing बैल आणि डास

बैल आणि डास

एकदा एक डास बैलाच्या शिंगावर जाऊन बसला. 

बैल शांतपणे माळरानातुन फिरत होता. 

थोड्यावेळाने डास शिंगावरून उठला. 

बैलाला म्हणाला “आता मी शिंगावरून उठतो दादा, तुम्हाला फार ओझं झालं असेल नाही?”

बैल म्हणाला “उठ नाहीतर बैस. कसलं ओझं? तु शिंगावर येऊन बसला आहेस हे हि मला समजलं नव्हतं.” 

डास खजील झाला. 

तात्पर्य: आपल्याला आहोत त्यापेक्षा फार मोठं समजु नये. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा