
एका व्यापाऱ्याकडे एक घोडा होता आणि एक गाढव होते.
तो व्यापारी गाढवावर सामान लादुन या गावातून त्या गावात जात व्यापार करीत असे.
घोडा त्याचा लाडका होता, त्यावर तो काही ओझे लादत नसे.
एकदा एका गावात व्यापाऱ्याकडे अतिच सामान झाले.
गाढवाच्या क्षमतेबाहेर ओझे झाले होते.
गाढव फार मुश्किलीने ते ओढत चालायचा प्रयत्न करत होते.
गाढवाने घोड्याकडे मदत मागितली. थोडे ओझे घेऊन त्याचा भार कमी करण्याची विनंती केली.
घोड्याने ते ऐकले नाही.
घोडा म्हणाला “हे माझे काम नाही. ओझे वाहणे हे गाढवाचेच काम असते. ते तु मुकाट्याने कर.”
दुर्दैवाने गाढव तो भार सहन न होऊन रस्त्यातच मेले.
आता व्यापाऱ्याकडे ओझे वाहायला पर्याय नव्हता.
व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे तर घोड्यावर लादलेच, पण त्यावर गाढवाची चामडी पण पुढे उपयोग होईल म्हणुन लादली.
थोडे ओझे घ्यायला नकार देणाऱ्या घोड्यावर आता त्याच्याहून किती तरी अधिक ओझे वाहुन नेण्याची वेळ आली.
व्यापाऱ्याला पुन्हा नवीन गाढव घेणे शक्य होईपर्यंत ओझे वाहण्याचे कामसुद्धा घोड्यावरच आले.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take