मृदुमान्य नावाचा एक राक्षस होता. तो भक्त प्रल्हादाचा नातु होता. प्रल्हादाचा मुलगा कुंभ, आणि कुंभाचा मुलगा मृदुमान्य.
इतर अनेक राक्षसांप्रमाणे ह्यालाही अमर व्हायचे होते. त्यासाठी त्याने महादेवाची तपस्या केली.
भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी मृदुमान्याला वर मागायला सांगितले.
त्याने अमरत्वाचा वर मागितला. हा वर देणे अशक्य होते.
मग त्याने असे मागितले कि मला स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या कोणाकडूनही मृत्यू येऊ नये. ते महादेवांनी मान्य केले.
झाले. समस्त सजीव हे त्या त्या प्रजातीतल्या स्त्रीकडूनच जन्माला येत असतात. त्यामुळे मृदुमान्याला कोणीही मारू शकत नव्हते.
त्याने मग याचा फायदा घेत लोकांवर अत्याचार सुरु केले.
ह्या वरामुळे देवांनाही त्याला मारता येत नव्हते.
त्याच्याशी युद्धात प्रचंड काढूनही काही उपयोग होत नव्हता.
देवांनी विश्रांतीसाठी एका आवळ्याच्या झाडाखाली एक गुहा होती, त्या गुहेत आश्रय घेतला.
प्रचंड पावसामुळे सगळ्यांना अंघोळही घडली होती.
गुहेत खायला काहीही नव्हते. सगळे उपाशीपोटी बसले होते.
त्या सगळ्यांच्या श्वासोच्छवासातुन एक ऊर्जा तयार झाली आणि तिने देवीचे रूप घेतले.
हि देवी कुठल्याही स्त्रीपासुन नाही तर उर्जेतुन तयार झाली होती.
तिनेच मृदुमान्याचा वाढ केला.
तो दिवस एकादशीचा होता, त्या देवीलाच एकादशी देवी म्हणतात. एकादशीच्या दिवशी तिला पूजतात.
एकादशी देवीबद्दलच यासारखीच एक पौराणिक कथा: एकादशी : मूर राक्षसाचा वध
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take