एक उंदीर खेडेगावात राहत होता.
शेतकऱ्यांच्या घरी असणारे धान्य, साधे अन्न खाऊन तो गुजराण करायचा.
त्याच्याकडे एकदा शहरातुन त्याचा दूरच नातेवाईक उंदीर आला.
त्याचं खेड्यातलं साधं आयुष्य पाहुन तो नावं ठेवु लागला.
अरे आमच्या शहरात कसली चंगळ असते, काय एक से एक पदार्थ खायला मिळतात अशा बढाया मारू लागला.
खेड्यातल्या उंदराने शहर पाहिलं नव्हतं.
तो कुतुहुलाने शहरी उंदरासोबत शहरात गेला.
शहरातली चकाचक घरे, दुकाने आणि हॉटेल्स पाहुन तो हरखला.
शहरातला उंदीर ज्या घराच्या बिळात राहत होता तिथे ते गेले.
स्वयंपाकघरात फिरून जे मिळेल ते खायला लागले.
खेड्यातल्या उंदराने तिथले बरेचसे पदार्थ याआधी खाल्लेच नव्हते. तो फार खुश झाला.
पण तेवढ्यात घरमालक आणि त्याची पाळलेली मांजर तिथे आले.
मांजर उंदरांच्या मागे लागली आणि मालक सुद्धा काठी घेऊन येत होता.
दोघं उंदरांनी धुम ठोकली, कसेबसे ते त्यांच्या तावडीतुन सुटले.
मग शहरातल्या उंदराने सांगितले कि आधी तिथे अजून उंदीर राहत होते आणि ऐश करत होते.
पण मालकाने मांजर पाळली आणि तिने ते उंदीर मारून खाल्ले. आता फक्त तोच राहिला होता.
खेड्यातला उंदीर म्हणाला “भावा, हि शहरातली चंगळ तुझी तुलाच धन्य असो. मी आपला गावात जातो. आयुष्य साधं असलं तरी इथल्यापेक्षा सुरक्षित आहे. गड्या आपला गावच बरा.”
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take