एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला.
तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता.
अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.”
एखाद्या बाळाच्या लहानपणी त्याची आई नसेल किंवा आजारी असेल तर त्या बाळाला दुध कमी पडू नये म्हणुन दुसऱ्या स्त्रीचे दुध पाजु शकतात.
ती स्त्री आपले दुध पाजुन आईसमान बनल्यामुळे तिच्या मुलांना भावंडासारखे समजतात. नातं दुधाचं असल्यामुळे अशा व्यक्तीला दुध भाई म्हणतात.
तो दूधभाई गेल्यावर अकबराने बिरबलाला विचारले, “काय बिरबल, तुला नाही का कोणी दुधभाई?”
“आहे ना खाविंद. उद्याच त्याची ओळख करून देतो.”
दुसऱ्या दिवशी बिरबल एका गाईच्या वासराला अकबराकडे घेऊन आला आणि म्हणाला “हे बघा खाविंद, माझा दुध भाई.”
अकबराने विचारले “हा वासरू आणि तुझा भाऊ?”
“होय खाविंद, मी ज्या गायीचे दूध पितो ती मला मातेसमान आहे. मग तिचा हा लेकरू मला भावसमानच झाला ना. म्हणुन हाच माझा दुध भाई.”
बिरबलाच्या विनोदबुद्धीमुले अकबर हसायला लागला.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take