महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला कल्याणच्या सुभेदाराचा प्रसंग प्रसिद्ध आहे. असाच एक प्रसंग महाराणा प्रतापांच्या आयुष्यातसुद्धा आला होता.
मोगल बादशाह अकबर याने अब्दुल रहीम खान-इ-खानान या सरदारास महाराणा प्रतापांवर हल्ला करण्यास पाठवले होते.
महाराणा प्रतापांचा मुलगा कुंवर अमर सिंग याने अब्दुल रहीम यांना एका लढाईत हरवले. लढाईनंतर मोगलांमध्ये पराजित पक्षाच्या स्त्रिया, मुले, सैनिक यांना बंदी बनवण्याची पद्धत होती.
अमर सिंगने त्याच प्रकारे अब्दुल रहीमच्या जनानखान्यातल्या स्त्रियांना बंदी बनवुन नेले.
महाराणा प्रतापांना हा प्रकार कळला तेव्हा ते संतप्त झाले. त्यांनी अमर सिंगची कानउघाडणी केली आणि त्या सर्व स्त्रियांना सन्मानाने मुक्त केले.
या दिलदारपणामुळे अब्दुल रहीम जो महाराणांचा शत्रु म्हणुन आला होता, तो हि भारावुन गेला. त्याने महाराणा प्रतापांचे आभार मानले आणि त्यांच्याविरुद्ध पुन्हा शस्त्र न उचलण्याचा निश्चय केला.
अब्दुल रहीम सैन्यातुन निवृत्त झाला. त्याने पुढे पुस्तके, कविता, दानधर्म अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. तो त्याकाळातील प्रसिद्ध कवि होता.
आपल्या शत्रुशी लढतानाही आपल्या तत्वांची पातळी खाली न येऊ देण्याच्या या गुणामुळेच महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांना शेकडो वर्षानंतरही आज पूजतात.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take