एकदा एक धनगर जंगलातुन जात होता.
जंगलातुन जात असताना त्याला अचानक सिंह दिसला. सिंहाला पाहुन धनगर एकदम घाबरला आणि जागीच थबकला.
पण सिंहाने त्याच्यावर हल्ला केला नाही, सिंह जागेवरून हललासुद्धा नाही.
नीट पाहिल्यावर धनगराला दिसलं कि सिंह विव्हळत होता, त्याच्या पायात एक मोठा काटा रुतून बसला होता. सिंहाचा पाय सुजला होता.
धनगराने त्याच्या हळु हळु जवळ जात त्याचा पाय हातात घेतला, आणि तो काटा ओढुन काढला.
धनगराला औषधी वनस्पती सुद्धा माहित होत्या. त्याने त्या आणुन त्यांचा रस सिंहाच्या पायावर लावला.
सिंहाला बरं वाटायला लागलं.
सिंहाने धनगराचे हात चाटून, त्याच्याजवळ अंग घासत कृतज्ञता व्यक्त केली.
धनगर पुढे निघाला.
खुप दिवसांनी धनगराच्या गावात एक मोट्ठी चोरी झाली आणि त्याचा आळ धनगरावर आला.
शिपायांनी धनगराला पकडुन राजासमोर नेले. धनगराने आपल्यावर असलेला आरोप नाकारला.
राजाने चिडुन धनगराला सिंहाच्या तोंडी द्यावे अशी शिक्षा दिली.
शिपायांनी धनगराला पकडुन एका सिंहाच्या पिंजऱ्यात सोडले.
पण आश्चर्य, सिंहाने त्या धनगराला मारले नाही, उलट त्याला मायेने चाटायला सुरुवात केली.
धनगराने त्याला ओळखले. हा तोच सिंह होता ज्याची धनगराने आधी मदत केली होती.
त्यांची गोष्ट राजालासुद्धा समजली. त्याला वाटले कि असा मुक्या प्राण्यांची सुद्धा मदत करणारा माणुस वाईट कामे करू शकत नाही.
त्याने धनगर आणि सिंह दोघांना मुक्त केले.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take