सेफ्टी पिन हि आता आपल्या नित्याच्या वापरातली गोष्ट झाली आहे. बायकांच्या पर्समध्ये हमखास अशा पिनांचा सेट असतो. अनेक प्रकारे या पिनांचा उपयोग होतो. साडी, ओढण्या, धोतर, पडदे, शर्टाच्या तुटलेल्या बटनाच्या ऐवजी हे आणि अशा अनेक प्रकारे आपण सेफ्टी पिना वापरतो.
पण हि आपल्या रोजच्या वापरातली गृहीत धरल्या जाणाऱ्या गोष्टीचा सुद्धा कोणी काही वर्षांपूर्वी शोध लावुन अविष्कार केला होता हे तुम्हाला माहिती आहे का? आज ऐकुया त्याचीच गोष्ट.
वॉल्टर हंट नावाचा एक अमेरिकन तंत्रज्ञ होता. त्याच्या नावावर अनेक तांत्रिक शोध आहेत. तो फार हुशार होता. पण एकदा त्याचा जरा खराब काळ चालु होता. त्याने मित्राकडुन १५ डॉलर उधार घेतले होते ते सुद्धा कसे परत करावे हा प्रश्न होता.
एकदा तो बसल्या बसल्या विचार करत होता. आणि विचार करता करता तो एका धातूच्या तारेही खेळत होता. बारीकशी तर असल्यामुळे तो वाकवेल तशी विकत होती फिरवेल तशी फिरत होती. खेळता खेळता त्याने तारेचं वेटोळं केलं आणि त्याच्या लक्षात आलं कि वेटोळं घातल्यावर तार थोडी स्प्रिंग सारखी करते.
तिला दाबुन धरलं तरच दोन टोकं जवळ राहतात अन्यथा ते लगेच एकमेकांपासुन दूर होतात. त्याने विचार केला कि ह्या दोन टोकांना समोरून काही अडकवलं तर काही छोटी गोष्ट जोडुन ठेवायला त्याचा वापर करता येईल. त्याने तसं केलं आणि हे डिझाईन एका डब्ल्यू. आर. ग्रेस नावाच्या कंपनीला विकलं. हि १८४९ ची गोष्ट आहे.
ह्या किरकोळ डिझाईनवर बनलेल्या पिन्सचा इतका मोठ्या प्रमाणावर वापर होईल असं त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. त्याने ते डिझाईन केवळ ४०० डॉलर्सला विकलं. त्याची उधारी सुटली आणि वर त्याला खर्चायला पैसे शिल्लक राहिले एवढाच तेव्हा त्याचा विचार होता.
पुढे सेफ्टी पिनला अफाट लोकप्रियता मिळाली कारण लोक त्याचा अनेक वेगवेगळ्या प्रकारे कल्पकतेने वापर करायला लागले. त्या कंपनीने ह्याच्या उत्पादनातुन लाखो रुपये कमावले. कधी कधी क्षुल्लक वाटणाऱ्या एखाद्या कल्पनेत सुद्धा एवढं सामर्थ्य असतं.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take