
एका कोल्ह्याने आजवर सिंह पाहिलेला नव्हता.
पहिल्यांदा त्याने सिंहासारखा प्रचंड आकाराचा शक्तिशाली प्राणी पाहिला तेव्हा त्याची भीतीने गाळणच उडाली. सिंहाला दुरूनच पाहुन त्याने धुम ठोकली.
पुढच्या वेळेस त्याने सिंह पाहिला तेव्हा त्याने जरा धीर धरला. एका झाडामागे लपुन त्याने सिंहाचे निरीक्षण केले.
त्याच्या पुढच्या वेळेस मात्र त्याचे जरा धाडस वाढले. पुन्हा सिंहाला बघितल्यावर त्याने पुढे होऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत मैत्री केली.
आपण आपल्याला अनोळखी गोष्टींनाच जास्त घाबरत असतो.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take