You are currently viewing राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातले संत होते. त्यांचं कार्य फक्त धार्मिक किंवा अध्यात्मिक क्षेत्रातलं नव्हतं, तर त्यांनी सामाजिक सुधारणा घडवुन आणण्यासाठीही बरेच प्रयत्न केले. 

त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या यावळी गावी ३०-एप्रिल-१९०९ रोजी झाला. त्यांचे मुळ नाव माणिकदेव बंडुजी इंगळे असे होते. त्यांनी लहान वयापासुनच अध्यात्मिक मार्गावर प्रवास सुरु केला. अडकोजी महाराज हे त्यांचे अध्यात्मिक गुरु होते. 

त्यांनी सर्व धर्मपंथांचा अभ्यास केला, त्याबद्दल जाणुन घेतले. आपापसातले भेदभाव कसे कमी करता येतील यावर चिंतन केले, प्रबोधन केले. त्यांनी हजारो भजने लिहिली आणि त्यांना चालबद्धही केले. सामाजिक विषयांवर अनेक लेख लिहिले. 

त्या काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांचा लढा चालु होता. तुकडोजी महाराजांनी त्यातही भाग घेतला. चले जाव आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवासही सोसावा लागला. 

स्वातंत्र्यानंतर त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी, तिथले जीवनमान उंचावे म्हणुन प्रयत्न सुरु केले. त्यांनी सामाजिक सहभागातून रस्ते बांधणी, ग्राम विकास अशी कार्ये केली. “अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ” चालु केले. 

आचार्य विनोबा भावेंनी जमीनदार आणि भूमिहीन शेतमजुर यांच्यातली दरी कमी व्हावी म्हणुन भुदान चळवळ सुरु केली. ज्यांच्याकडे मुबलक जमीन आहे अशा श्रीमंत शेतकऱ्यांनी आपल्या गरीब बांधवांसाठी आपल्याला आपल्या कुटुंबासाठी पुरेल एवढी जमीन सोडुन उरलेली जमीन दान द्यावी. ती जमीन गावातल्या गरीब लोकांमध्ये वाटुन त्यांनी त्या जमिनीवर आपल्या मेहनतीने आपले नशीब घडवावे अशी हि कल्पना होती. तुकडोजी महाराजांनी त्यातही भाग घेतला. 

बंगालचा दुष्काळ, भारत-चीन युद्ध, कोयना

तुकडोजी महाराजांनी “ग्रामगीता” लिहिली. ह्या ग्रामगीतेत गावांचा विकास कसा करता येईल, गावे संपन्न कशी होतील याबद्दल विचार मांडले होते. 

देव तर सगळीकडेच आहे, मग नुसते मंदिर/मशिदीत जाऊन देव देव करत बसण्यापेक्षा माणसाने कष्ट करून स्वतःचा आणि इतरांचा विकास साधावा अशी त्यांची शिकवण होती. त्यांचा देवावर विश्वास होताच, पण फक्त देवाच्या नावाने निष्क्रिय होण्याऎवजी माणसाने सक्रिय झाले पाहिजे, असे त्यांना वाटायचे. 

भारताचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा “राष्ट्रसंत” म्हणुन गौरव केला. 

११-ऑक्टोबर-१९६८ रोजी ते अनंतात विलीन झाले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा