
एकदा एका कोल्ह्याला फिरता फिरता एका धान्याच्या गोदामात घुसण्याचा मार्ग सापडला.
ते एक अगदी छोटंसं छिद्र होतं, पण कोल्ह्याला आत घुसत येईल इतपत होतं.
कोल्ह्याला फार आनंद झाला.
तो गोदामात शिरला.
त्याने तिथे असलेल्या अन्नावर यथेच्छ ताव मारला.
त्याने इतकं खाल्लं इतकं खाल्लं कि त्याचं पोट टम्म फुगलं.
आणखी अन्न घशाखाली उतरेना तेव्हा कुठे त्याने परत जायचा विचार केला.
पण आता पंचाईत झाली.
ज्या छिद्रातुन तो आत आला त्या छिद्रातुन त्याला फुगलेल्या पोटामुळे काही केल्या बाहेर जाता येईना.
त्याची हि अवस्था बघुन बाहेर एका मुंगुसाला हसु आले.
तो म्हणाला “पहा असं काही विचार न करता अधाशासारखं खाऊन काय अवस्था झाली आहे तुझी. आता खाल्लेलं जिरून पोट नेहमीसारखं होत नाही तोवर तुला मधेच अडकुन रहावं लागेल.”

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take