
एका कुरणात एक घोडा रोज चरत असे.
तिथे एक काळवीटसुद्धा चरायला येऊ लागले.
त्या कुरणात खाद्याला काही कमी नव्हती.
तरीही घोड्याला काळवीटाचे तिथे येणे पसंत नव्हते.
तो रोज त्याच्याशी हुज्जत घालायचा.
एके दिवशी त्यांच्या भांडणाचे मारामारीत रूपांतर झाले.
घोड्याला काही त्या काळविटाला बळजबरीने हुसकावता आले नाही.
त्याने या कामासाठी एका माणसाची मदत घेण्याचे ठरवले.
माणुस घोड्यावर स्वार झाला आणि त्यांनी मिळुन काळविटावर हल्ला केला.
माणसाच्या मार्गदर्शनामुळे घोड्याला आता काळविटाला हरवता आले.
पण तोपर्यंत घोडा किती उपयुक्त आहे हे माणसाच्या लक्षात आले होते.
त्याने घोड्याला बांधुन घरी नेले आणि आपल्या कामासाठी, प्रवासासाठी वापरायला लागला.
काळवीटाशी भांडण्याच्या नादात घोडा आपले स्वातंत्र्य गमावुन बसला.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take