You are currently viewing गाढव आणि म्हातारा

गाढव आणि म्हातारा

एकदा एका राज्यावर शत्रूचा हल्ला झाला. 

त्या राज्याच्या सीमेवर असलेल्या गावांमंध्ये धावपळ सुरु झाली. 

एक माणुस पळुन सुरक्षित जागी जायच्या तयारीत होता. 

त्याच्याकडे एक गाढव होते. 

ते कुरणामध्ये चरत होते. 

तो गाढवाकडे जाऊन म्हणाला “चल लवकर, शत्रु यायच्या आत आपण इथुन निघुन जाऊ.”

गाढव म्हणाले “शत्रु येऊन मला काय करेल? माझ्यावर तुझ्यापेक्षा दुप्पट भार टाकेल का?”

“ते असं का करतील? जनावरांना पेलवेल एवढाच वापर करतील ना.”

“मग मला काय फरक पडतोय? मालक बदलला तरी काम तर तेच करायचंय. तू पळ. मला शांतपणे चरू दे.”

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा