रमेश आणि सुरेश असे दोन मित्र एका लहानशा गावात राहत होते.
जवळच्या एका मोठ्या गावात मोठी जत्रा भरली होती. त्या गावी जायचा रस्ता जंगलातुन जात असे. त्यामुळे रमेश आणि सुरेश दोघांनी सोबत जायचे ठरवले.
जंगलातुन जात असताना त्यांना समोर अस्वल दिसले. रमेश ताबडतोब बाजूला एका झाडावर चढला. अस्वलाचे लक्ष त्यांच्याकडे गेले.
सुरेशला झाडावर चढता येत नव्हते. तो जमिनीवर निपचित पडला आणि मेल्यासारखे नाटक केले.
अस्वल त्याच्या जवळ आले. तो श्वास रोखुन पडला होता.
अस्वलाने त्याला सगळीकडुन हुंगून पाहिले. अस्वलाला त्याच्यात काही विशेष रस वाटला नाही. अस्वल तिथुन निघुन गेले.
अस्वल दूर गेल्याची खात्री झाल्यावर रमेश झाडावरून खाली उतरला.
त्याने सुरेशला गमतीने विचारले, “काय रे ते अस्वल तुझ्या कानात काय सांगत होते?”
सुरेश म्हणाला, “त्या अस्वलाने मला मोठी ज्ञानाची गोष्ट सांगितली कि जो संकटकाळी सोडून जातो तो खरा मित्र नव्हे.”
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take