एकदा एका नदीतुन दोन भांडे वाहत चालले होते.
एक भांडे मातीचे होते.
एक भांडे पितळेचे होते.
पितळी भांडे मातीच्या भांड्याला हाक मारून म्हणाले “बरं झालं तू तरी आहेस सोबत. नाहीतर जमिनीवर पोहचेपर्यंत एकट्याने फार कंटाळा आला असता. जरा जवळ ये, गप्पा मारूया.”
मातीचे भांडे म्हणाले “आपण जरा दूर राहिलेलंच बरं. तु म्हणतोयस ते ठीक आहे, पण एखादी लाट जोरात आली आणि आपण एकमेकांवर आपटलो तर माझे तर तुकडेच होतील. त्यापेक्षा कंटाळा आला तर हरकत नाही, पण जमिनीवर पोहचेन तरी.”

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take