नमस्कार मित्रांनो,

मराठी-गोष्टी.कॉम  या संकेतस्थळावर आपलं सहर्ष स्वागत आहे.

माणसाला गोष्टी सांगायला फार आवडतं. त्यामुळेच तोंडी सांगणे, लेण्या, शिल्पे, चित्रे, पुस्तक, चित्रपट असे त्या त्या काळी जे काही माध्यम असेल त्या माध्यमातुन आपले पूर्वज आणि आपण गोष्टी सांगत आलो आहोत. 

या गोष्टींनीच जगभरातल्या संस्कृती घडल्या आहेत. मराठी भाषेतही गोष्टींचा समृद्ध खजिना आहे. हाच खजिना सर्वांसाठी सहजतेने उपलब्ध व्हावा म्हणुन हे संकेतस्थळ सुरु केलं आहे. 

१३-एप्रिल-२०२१ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही हे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले केले. 

ऐतिहासिक, पौराणिक, परीकथा, बोधकथा, लघु-चरित्र, खाद्यपदार्थ ई. विविध प्रकारच्या गोष्टी यावर आज उपलब्ध आहेत आणि यात सातत्याने नवीन गोष्टी, नवीन कथाप्रकार यांची भर पडत जाणार आहे. 

आम्हाला खात्री आहे, आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचा पाठिंबा आम्हाला मिळेल. तुम्ही स्वतः या गोष्टींचा आनंद घ्या, आपल्या घरातल्या मुलांना द्या आणि सर्व मराठी बांधवांपर्यंत हे संकेतस्थळ पोहोचवा. 

चला, वाचूया!!!