मराठी गोष्टी

अक्षय्य तृतीया

तिथी: वैशाख महिन्याची शुक्ल तृतीया

अक्षय्य तृतीया हा हिंदु आणि जैन धर्मात अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. अक्षय्य म्हणजे क्षय होत नाही असे. हा शुभ आणि समृद्धीचा दिवस, महत्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. पुराणानुसार यादिवशी अनेक शुभ घटना वेगवेगळ्या काळी घडल्या. 

या दिवशी भगवान विष्णूंचे सहावे अवतार श्री परशुरामाचा जन्म झाला. 

स्वर्गातुन गंगा भगिरथाची प्रयत्नामुळे या दिवशी पृथ्वीवर अवतरली. 

कुबेराला आपले अमाप धन याच दिवशी मिळाले. 

वेद व्यासांनी गणपतीला याच दिवशी महाभारत ऐकवायला सुरु केले. 

महाभारतात पांडव वनवासात असताना त्यांच्या अन्नाची सोय व्हावी म्हणुन सूर्यदेवाने याच दिवशी त्यांना “अक्षय्य पात्र” वरदान म्हणुन दिले. या दिवसाचे अक्षय्य तृतीया हे नाव याच घटनेमुळे पडले.

कृष्णाने आपल्या बालमित्र सुदाम्याला याच दिवशी आपल्या कृपेने गरिबी दूर करून समृद्ध केले. 

जैन धर्माचे पहिले तीर्थांकर ऋषभदेव यांनी आपले वर्षभराचे व्रत यादिवशी संपन्न करून राजा श्रेयसच्या हातुन उसाचा रस घेतला. 

हा दिवस महत्वाचा शुभमुहूर्त असल्यामुळे या दिवशी महत्वाची खरेदी (सोने, दागिने, वाहन इ.) किंवा घरातले शुभकार्य या दिवशी करतात. काही घरी अक्षय्य तृतियेपासूनच आंबा खायला सुरु करतात. 

जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेत वापरले जाणारे रथ या दिवशीपासुन बनवायला चालु करतात. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version